Crime 24 Tass

Nagpur fire:नागपूरच्या बेलतरोडी परिसरात अग्नितांडव

100 हून अधिक झोपडय़ांना आग

बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. यात जवळपास शंभर झोपडय़ा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली 20 ते 25 गॅस सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने परिसरातील नागरिक दहशतीत होते.

सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे शेकडो लोकांचा संसार उघडय़ावर पडला, त्यामुळे परिसरात आक्रोशाचे चित्र होते.

सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक मोठा स्फोटाचा आवाज झाला व त्यानंतर झोपडय़ांमध्ये आग लागली. झोपडपट्टी मोठी असून, झोपडय़ा आजूबाजूला लागून असल्याने आग वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पथक पोहोचण्याअगोदरच शंभराहून अधिक झोपडय़ा आगीच्या विळख्यात सापडल्या होत्या. नागरिकांनी घरातील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आग पसरत असताना काही झोपडय़ांमधील सिलिंडर्सचा स्फोट झाला. त्यामुळे ज्वाळा आणखी तीव्र झाल्या. काही किलोमीटर अंतरावरूनदेखील आग दिसून येत होती. अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या, तसेच पोलिसांनीदेखील धाव घेतली. अरुंद गल्ल्या असल्याने मदतकार्याला वेळ लागला. सुमारे अडीच तासानंतर आग विझवण्यात यश आले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]