Crime 24 Tass

धर्मवीर: ‘बाळासाहेबांचा मुलगा CM, शिष्य कॅबिनेट मंत्री

पण दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही’; नितेश राणे

मुंबई : आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे‘ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसाद ओक अभिनीत ‘धर्मवीर’ सिनेमा काल आज १३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. खरंतर, ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. अशात भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलं की, ‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही.’ अशा शब्दात निलेश राणेंनी शिवसेनेच्या वर्मावर बोट ठेवलं आहे.

निलेश राणेंच्या या टीकेवर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, या सिनेमा सध्या जोरदार चर्चेत असून पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होणार आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]