५-६ फटके दिल्यांनतर अक्कल येईल’
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेवर जोरदार टीका होत आहे. केतकीने फेसबुकवर शरद पवार यांच्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठेंबरे यांनी केतकीचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्र टाईम्सशी बोलताा रुपाली पाटील म्हणाल्या मुळात केतकीचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि जरी मानसिक संतुलन बिघडले असले तरी ती अन्ना ऐवजी शेण खात नाही. तिने ज्यांच्यावर टीका केली आहे ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही तर राजकारणातील आताचे जेष्ट आणि ज्यांच्या पिढ्या न् पिढ्या राजकारणात आहेत अशांचे मार्गदर्शत आदरणीय शरद पवार आहेत. केतकीचे वय काय, आपण कोणा विषयी बोलतोय. टीका करताना ब्राम्हण, मराठा, हिंदू मुस्लीम या गोष्टी आणायच्या आणि मन की बात बोलून समाजाचे स्वास्थ बिघडवण्याचे काम केले जात आहे.
तिचे आई-वडील संस्कार द्यायला कमी पडले म्हणून ही वेळ आली आहे. आता तिला छडी लागली की अक्कल येईल. तिचे वय काय आणि पवारांचे वय काय? समाजाबद्दलचे योगदान काय? असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारला.
चोप देणे हाच एक पर्याय
माझी तरी अशी इच्छा आहे की, काळ्या शाईने तिचे तोंड रंगवावे आणि ५-६ फटके द्यावेत ज्यामुळे तिला अक्कल येईल, असे रुपाली पाटील म्हणाल्या. केतकीने जर तिच्या पहिल्या पिढीला विचारले तर ते लोक देखील सांगतील की, त्यांनी शरद पवारांच्या सोबत काम केले आहे. केतकी ब्राम्हण समाजातील आहे म्हणून संपूर्ण समाज तसा असे कधीच होत नाही. पण या समाजात असे काही लोक आहेत ज्यांना चोप देणे हाच एक पर्याय आहे.
