भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचे आवाहन
पवनी :- जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून कार्यकर्त्यांनी ओढवून घेतलेल्या नाराजीच्या सुराप्रती मी संवेदनशील असून याचा परिणाम पक्ष संघटनेवर होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी नाराजी नाट्य बंद करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले.
ते पुढे म्हणाले, ‘पदापेक्षा पक्ष मोठा’ याचे भान ठेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी वागले पाहिजे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडी माझ्यावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दुःखाच्या असल्या तरी सार्वजनिकरित्या पक्षाच्या हिताच्या नाहीत. माध्यमात अथवा व्हाट्सएप ग्रुपवर रोज येणाऱ्या पोस्ट माझ्या कार्याचा उहापोह करणाऱ्या जरी असल्या तरी पक्षासाठी घातक आहेत असे सांगतांना कार्यकर्त्यांनी संयम आणि धीर ठेवावा. मी जिल्ह्यात वडीलधाऱ्याच्या भूमिकेत असल्याने लहान व्यक्तींचे हट्ट व लाळ पुरवावे लागते असा मिस्कील टोला पक्षातील विरोधकांवर पंचभाई यांनी लावला.
राज्य स्तरावरील कांग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या होणाऱ्या आघाडीमूळे आपली सत्ता येणार अशी स्थिती असतांना राष्ट्रवादीने केलेली कुरघोळी विभिसनाच्या औलादीची पंचायत समिती सभापती निवडणुकीत ठरली. पवनी सारख्या ठिकाणी राष्ट्रवादीवादीशी युतीची चर्चा झाली असतांना त्यांनी धोका दिला. तर भंडारा येथे राष्ट्रवादी ने भाजप सोबत युती केल्याची बातमी कळताच चरण वाघमारे यांनी तुमसरमध्ये मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार आम्ही त्यांना साथ दिली. याची परतफेड म्हणून चरण वाघमारे यांच्या गटाच्या समर्थनाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. तुम्ही अध्यक्ष पदाची संधी का सोडली? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले जिल्ह्याचा पक्षप्रमुख म्हणून मला संयम बाळगतांना बलिदानाला समोर जावे लागले असे सांगून कार्यकर्त्यांनी नाराज न होण्याचे आव्हान केले. ‘धीरज का फल मिठा होता है’ असे म्हणत कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेसाठी जोमाने कार्य करावे असा सल्ला देखील मोहन पंचभाई यांनी दिला.
