Crime 24 Tass

Bhandara:मंडळ अधिकाऱ्यावर हातोडा उगारून टिप्पर पळविला

पवनी पोलिसात चालक, मालकाविरुद्ध गुन्हा

भंडारा : बिना परवाना मुरुमाची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी पंचनामा करून तो ताब्यात घेतला. दरम्यान, टिप्पर मालकाने मंडळ अधिकाऱ्यावर हातोडा उगारून टिप्पर पळवून नेल्याची घटना पवनी तालुक्यात घडली. 

नत्थू शेंडे असे फिर्यादी मंडळ अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी टिप्पर चालक विनोद शहारे, क्रीष्णा सावरबांधे दोघेही रा. आसगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी शेंडे हे महसूल विभागाच्या पथकासह रात्र गस्तीवर असताना हा प्रकार बाचेवाडी ते निघावी मार्गावर घडला. टिप्पर मालक क्रीष्णा सावरबांधे याने महसूल पथकाला धमकावत, टिप्पर कसा नेता पाहून घेतो, असे म्हणत हातोडा उगरला. त्यानंतर टिप्परमधील मुरूम घटनास्थळीच खाली करून बळजबरीने टिप्पर पळवून नेला. पवनी पोलिसांनी चालक विनोद आणि मालक क्रीष्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नागरिकर करीत आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]