Crime 24 Tass

Bhandara Crime:बहिनिवर चाकूने वार करुन भावाचे विषप्राशन

मांढळ येथील घटना

लाखांदूर:बहिणीच्या घरी वाढलेल्या पोटच्या पोराचे लग्न आईवडिलांना विश्वासात न घेता बहिनीने परस्पर उरकून दिल्याच्या आरोपात संतप्त भावाने बहिणीच्या पाठीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. सदर घटनेची पोलिसात तक्रार होताच धास्तावलेल्या भावाने 16 मे रोजी सकाळच्या सुमारास विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती देण्यात आली आहे. गोविंदा अर्जुन कांबळे (55) रा.मांढळ असे घटनेतील विष प्राशनकर्त्या भावाचे नाव आहे तर मैना दादाजी चंडीमेश्राम (60) रा. जुनोना ता.पवनी असे भावाच्या चाकू हल्ल्यात जखमी बहिनीचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार, घटनेतील विष प्राशनकर्त्या भावाचा महेश नामक मुलगा गत 14 वर्षापासून घटनेतील चाकू हल्ल्यात जखमी बहिणीकडे राहत होता. दरम्यान बहिणीकडे राहत असलेल्या महेशचे बहिनीनेच मुलीसोबत लग्न करुन देत घर देखील बांधून दिले. मात्र यासबंध कार्यात बहिनीने भाऊ -भावजयला विश्वासात न घेतल्याच्या आरोपावरून गत 15 मे रोजी वास्तुपुजन कार्यक्रमासाठी मांढळ येथे आलेल्या बहिनिसोबत भाऊ भावजयने शिविगाळ करुन वाद केला.


सदर शिविगाळ प्रकरणी बहिनीने हटकले असता संतप्त भावाने बहिणीच्या पाठीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेची पोलिसात तक्रार होताच पोलिस कारवाइपुर्वीच धास्तावलेल्या भावाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, भावाने विष प्राशन केल्याचे सबंधिताचे कुटुंबियांना माहित होताच सबंधिताला तात्काळ उपचारार्थ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.


या घटनेत पिडीत बहिणीच्या मुलाने लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केल्याने बहिणीला शिविगाळ करुन चाकूने पाठीत वार केल्याप्रकरणी पोलीसांनी आरोपी भाऊ व भावजयच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिलिप भोयर व पोलिस अंमलदार अनिल राठोड करीत आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]