Crime 24 Tass

BHANDARA :जिल्हा परिषद अध्यक्षांन मुळे ‘लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांची’ भंबेरी उडाली

खुर्ची मांडून बसले प्रवेशद्वारात; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली तंबी

भंडारा: कर्मचारी तर सोडाच अधिकारीही शासकीय कार्यालयात वेळेत पोहोचत नाही. त्यानंतर कामाच्या नावावर थातूरमातूर फाइल चाळणे आणि चहा टपरीवर वेळ घालवणे, असा दैनंदिन कार्यक्रम कर्मचाऱ्यांचा असतो. याची जाण ठेवून नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी अशा लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चाप बसावा म्हणून सोमवारी स्वतः प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. त्यामुळे अनेकांची बोबडी वळली. यावेळी त्यांनी उशिरा आलेल्या सर्व महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना तंबी दिली.

सीईओसह अन्य अधिकारी गायब
नवनियुक्त अध्यक्ष जिभकाटे यांच्या अभिनव प्रकारात केवळ बोटावर मोजण्याइतके अधिकारी आणि कर्मचारी वेळेत पोहोचल्याचे आढळून आले. वेळेत आलेल्यांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य (प्रशासन) पानझाडे, शिक्षणाधिकारी बारस्कर, डोरलीकर, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता घरडे, पशू संवर्धन विभागाचे अधिकारी भगत हे उपस्थित होते. तर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मुन यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अनेक विभाग प्रमुख दुपारी १२ पर्यंत पोहोचले नसल्याचा गंभीर प्रकार घडला.

९.४५ वाजताच जिल्हा परिषदेत दाखल झाले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांचे बहीण जावई असलेले गंगाधर जिभकाटे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ जवळून बघितला आहे. किंबहुना एखाद्या कामासाठी तिथे गेल्यावर कर्मचाऱ्यांकडून कसा त्रास होतो, याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाळ सांभाळताच त्यांनी अगदी १४ व्या दिवशी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. नवनियुक्त अध्यक्ष जिभकाटे हे सकाळी अगदी ९.४५ वाजताच जिल्हा परिषदेत दाखल झाले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यालयात पोहोचण्याची वेळ झाली होती. यावेळी त्यांनी प्रवेशद्वारात खुर्ची टाकून,येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेळेची नोंद घेतली. तसेच अनेकांना त्यांनी समजावून सांगितले. तर, काहींना शासकीय कामकाज कसे करायचे याचीही माहिती दिली. या दरम्यान, त्यांनी कामासाठी आलेल्या बाहेरील व्यक्तिंचीही विचारपूस करून मार्गदर्शन केले. सकाळी ९.४५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्ष जिभकाटे हे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दालनात बसले होते.

वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुमारे वर्षभरापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुणाचाच धाक नव्हता. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेचे भान विसरले होते. त्यामुळे त्या सवयीनुसार अनेक जण उशिरा पोहचले. मात्र, मुख्य प्रवेशद्वारातच जिल्हा परिषद अध्यक्ष स्वतः खुर्चीवर बसून असल्याने उशिरा आलेल्या सर्वांवर त्यांची कारणे विचारला केली. यावर अनेकांनी परस्पर दौरा करून आलो, कोणी बँकेत गेल्याने उशीर झाला, तर, काहींनी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासकीय कामाचा अंदाज असल्याने अध्यक्ष जिभकाटे यांनी सर्वांना यापुढे, असे चालणार नाही, वेळेत कार्यालयात या, हलचल रजिस्टरमध्ये नोंद करा. त्यानंतर बाहेर जाऊन शासकीय दौरे करा, असा तंबी वजा इशारा दिला.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]