भंडारा : आदर्शाचे धडे ज्या वडीलधाऱ्या मंडळींकडून मिळायला पाहिजे. अशा आजोबांनीच नात्याजा काळीमा फासणारे कृत्य करीत नातीवर अत्याचार केला. एका वृद्धाने चारवेळा अत्याचार केला तर, दोघांनी अश्लील चाळे केले. ही घटना लाखनी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी आजोबासह तिघांना अटक केली आहे.
विलास तुमसरे (५६), यशवंत कमाने (६७) दोन्ही रा. गडेगाव, अनिल सेलोकर (२५) रा. रोहना ता. मोहाडी असे अटक करण्यात आलेल्या तिन्ही वासनांधांचे नाव आहे. पीडीत अल्पवयीन मुलगी ही १३ वर्षांची असून तिच्यावर ११ व्या वर्षी पहिल्यांदा अत्याचार झाला. तेव्हापासून विविध ठिकाणी आणि वेळोवेळी अश्लील चाळे, अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडिता स्वतः लाखनी पोलिसात पोहचून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी घटनेचे गंभीर ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तिघांनाही विनयभंग, अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार तायडे करीत आहे.
