Crime 24 Tass
Crime24tass news

शिवशाहीची बोलेरोला मागून धडक, चिमुकली ठार; आई-वडील, आजी गंभीर

जवाहनगर (भंडारा) : भरधाव शिवशाही बसने बोलेरो जीपला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ वर्षीय मुलगी ठार तर आई-वडील आणि आजी गंभीर जखमी झाली.

हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर भंडारा तालुक्यातील ठाणा येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. मृत व जखमी नागपूर जिल्ह्यातील दिघोरी येथील आहेत.

आयुषी संदीप खापणे (८) रा. दिघोरी ता. कामठी जि. नागपूर असे मृत बालिकेचे नाव आहे. तर संदीप दिवाकर खापणे (३५), ज्योती संदीप खापणे (३०) आणि संदीपची सासू या अपघातात जखमी झाले. जखमींना भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी नागपूर येथून ते राष्ट्रीय महामार्गावरून भंडाऱ्याकडे येत होते.

भंडारा तालुक्यातील ठाणा येथे नागपूर आगाराच्या शिवशाही बसने बोलेरो जीपला मागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की बोलेरोच्या मागच्या भागाचा चुराडा झाला. त्यात आयुषी जागीच ठार झाली तर जीप चालवीत असलेले संदीप खापणे, त्यांची पत्नी ज्याेती आणि संदीपची सासू गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती जवाहनगर पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवशाही बसचालक अजहरुद्दीन शेख (३३) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तपास ठाणेदार पंकज बैसाने करीत आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]