आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आंदोलनाचा दणका
भंडारा/प्रतिनिधी: भांडरा शहरात मागील वर्ष भरापासून चर्चेत असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील गाळे बांधकामाच्या कामाला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे.जिल्हा परिषद भंडारा च्या मालकीच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रवेश द्वारावर बांधा,वापरा व हस्तांतरित करा तत्वावर बिल्डर्सना कामाचे कंत्राट देण्यात आले होते.
तत्कालीन जीपच्या पदाधिकारी यांनी चुकीचा ठराव घेऊन शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत माजी वि
द्यार्थी संघटनेने व शहरातील अनेक नागरिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता.आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा अनेकदा शासनाला पत्र व्यवहार करून या निर्णयाला विरोध केला होता. या प्रकरणात अनेक संघटनांचा वाढता विरोध व जनसामान्यांच्या भावना चा आदर करीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी, जीप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे काम थांबविण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा सदर प्रकरणाचे गंभीर्ये लक्षात आणून दिले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर बांधकामाला स्थगिती दिली आहे.
