१० जुगाऱ्या सह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
भंडारा: जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नाकाडोंगरी जंगल परिसरात सुरू असलेल्या तासपत्तीच्या जुगार अड्यावर भंडारा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकुन जुगार खेळणाºया ११ जुगाºयांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन ७ लाख १८ हजार १० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाई दिनांक ८ जून रोजी करण्यात आली.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी जंगल परिसरातशुभम जैन यांचे मालकीच्या जागेतील झाडीझुडपी परीसरात जुगार खेळविल्या जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.त्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार स्थागुशा चे पोनि जयवंत चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोउपनि रविंद्र रेवतकर, पोहवा. रोशन गजभिये, विजय राऊत, कैलास पटले, पोना. प्रषांत कुरंजेकर, प्रफुल कठाणे यांनी खाजगी वाहनाने जुगाराच्या अड्डयावर धाड टाकली असता जुगार स्थळी १० इसम जुगार खेळतांना मिळुन आले.
जुगार खेळणाºयांमध्ये संदीप दयाराम मेश्राम वय ३१ वर्षे रा. आष्टी ,अमितकुमार महेषकुमार यादव वय २८ वर्षे रा. शिवनी (मध्यप्रदेष),क्रिष्णा नामदेव बोरकर वय ३२ वर्षे रा. लोभी ता. तुमसर, शिवांकसिंग प्रविणसिंग ठाकुर वय २६ वर्षे रा. तुमसर, राजकुमार गुलाब यादव वय २५ वर्षे रा. नाकाडोंगरी ,कुणाल पुरुषोत्तम माणकर वय २६ वर्षे रा. नाकाडोंगरी, संजीव षिवनाथ साहु वय ३० वर्षे रा. पलारी ता. षिवनी (मध्यप्रदेश) , उमाशंकर झम्मीलाल यादव वय ३५ वर्षे रा. शिवनी (मध्यप्रदेश), शुभमसिंग रतनसिंग ठाकुर वय २८ वर्षे रा. षिवनी (मध्यप्रदेष) व आशिष कैलास यादव वय ३२ वर्षे रा. शिवनी (मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. पोलीसांनी घटनास्थवरून ५२ तासपत्ते व नगदी रूपये तसेच आरोपीची अंगझडतीत घेतली असता ४५ हजार ९५० रूपये मिळुन आले.
घटनास्थळावर एक चारचाकी बुलेरो गाडी क्रमांक एम. पी. ४०/ टी-०६२५ किंमती ६ लाख रूपये व ७ मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा एकुण ७ लाख १८ हजार १० रूपयांचा मुद्येमाल जप्त केला.स्थागुशाच्या अधिकाºयांनी सर्व आरोपीविरूध्द पोस्टे गोबरवाही येथे अपराधा क्रमांक ७८/२०२२ कलम १२ (अ)महा. जु. का. सहकलम १०९ भादवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, सपोनि. नितीनचंद्र राजकुमार, पोउपनि रविंद्र रेवतकर, पोहवा. रोषन गजभिये, विजय राऊत कैलास पटोले, पोना. प्रषांत कुरजेकर, प्रफुल कठाणे यांनी पार पाडली.
