Crime 24 Tass

Bhandara accident:एस टी बस च्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मृतक हा पोलीस विभागाचा कर्मचारी

भंडारा : भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१३ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात घडली.मृतक हा तिरोडा पोलीस स्टेशनचा कर्मचारी असुन दुलीचंद बरबैय्या वय ४८वर्षे रा.लाला लजपतराय वार्ड भंडारा असे त्याचे नाव आहे.


भंडारा-रामटेक मार्गाची रा.प.परिवहन विभागाची बस क्र.एमएच.१४ बिटी.०६६५ आज सकाळी प्रवाशी घेवुन भंडारा बसस्थानकावरून रामटेक कडे जाण्यास निघाली असता भंडारा शहरातील राजीव गांधी चौक येथे दुचाकी क्र.एम. एच.३६/एएफ-१६१९ ने तिरोडा येथे कर्मव्यावर जाणाऱ्या मृतक दुलीचंद बरबैय्या यांच्या दुचाकीला मागेहुन जोरदार धडक दिली.त्यात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि.साठवणे करीत आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]