Crime 24 Tass
Crime24tass news

गोंदिया शहरातील, पिण्याचे पाणी, गटार योजना, घरकुल समस्यांवर तोडगा काढा. खा.सुनिल मेंढे

गोंदिया-महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व नगर परिषद गोंदिया यांच्या सोबत आज झालेल्या संयुक्त बैठकीत गोंदिया शहरातील समस्यांवर चर्चा करून अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. शहरातील लोकसंख्या दिवसें दिवस वाढत असल्याने वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव तयार करण्यात यावे . ज्यामुळे शहरात दोन्ही वेळा पाणी शहरात पुरवठा करण्यात येईल. व त्या अनुपाताने शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करणे. पावसाळ्यापूर्वी गटर योजनेचे सुरु असलेले काम पूर्ण करणे. शहराच्या उत्तर दक्षिण भागाला जोडणाऱ्या पाईप लाईनसाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करणे तसेच शहरातील गटार जोडणीसाठी आवश्यक योजना तयार करण्यासाठी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याना निर्देश देण्यात आले.
मोक्षधाम परिसरात असलेल्या डंपिंग यार्ड मुळे नागरिकांना दुर्गंधी स्वच्छता इ. समस्यांचा सामना करावा लागतो. डंपिंग यार्ड साठी नवीन जागा उपलब्ध करून देऊन मोक्ष धाम परिसरातील डंपिग यार्ड ची जागा रद्द करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश खा.मेंढे यांनी दिले. रहदारीच्या असलेल्या जयस्तंभ चौक व नेहरू चौक येथे सार्वजनिक स्वच्छता गृहे उभारणे व स्वच्छता सप्ताहाचे नियोजन करून प्रत्येक वार्ड मध्ये सफाई अभियान सुरु करण्याचे निर्देश नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील चारही मुख्य नाल्यांची स्वच्छता झाली असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.
नागरिकांना पाण्यासाठी फिरावे लागू नये यासाठी “हर घर नल” हि योजना सुरु करण्यात आली. योजनेचा फायदा सर्व नागरिकांना मिळावा यासाठी शहरातील अवैध नळ जोडणी शोधून वापरलेल्या पाण्याचे मुल्य वसूल करण्याचे निर्देशही खा.मेंढे यानी दिले.
यावेळी खा.सुनिल मेंढे, मा.बाळाभाऊ अंजनकर, मा. संजय कुलकर्णी, मा.राजकुमारजी कुथे, मा. ओमजी कटरे, मा.सौ.भावनाताई कदम, मा.गजेंद्रजी फुन्डे, , मा.सुनिल केलनका, मा. बंटी पंचबुद्धे, मा.मुजीब पठाण, मा.दिनेश दादरीवाल, मा.संजय मुरकुटे, मा.ऋषिकांत शाहू, मा.चंद्रभान तरोने, मा.मनोज पटनायक, मा.शंभूशंकर ठाकूर, मा.दीपक कदम, मा. पाटील साहेब कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, मुख्य अधिकारी श्री.करण चव्हाण, उपमुख्य अधिकारी श्री.राणे व सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]