लाखनी (भंडारा) : पतीसोबत जात असलेली महिला दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाली. जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, १३ जून रोजी दुपारी ३ वाजता रेंगेपार/कोहली मार्गावर घडली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव सौ. शिवानी श्रीकांत मेश्राम (वय 20, रा. भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गाव) असे समजते.
शिवानी या पती श्रीकांत मेश्रामसोबत दुचाकीवरून जात होत्या. यादरम्यान ती अचानक रस्त्यावर पडली. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्यांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास सौ.शिवानी श्रीकांत मेश्राम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला असून सहायक फौजदार बागडे तपास करत आहेत.
