समजातील सौभाग्यवती महिलांनीच वडाची पूजा करावी मात्र विधवांनी का नाही – महिला अध्यक्ष शोभाताई बावणकर
देशात वट पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आज मंगळवार ला भंडारा शहरातील नूतन महाराष्ट्र जवळील अन्न पूर्णा माता मंदिर खात रोड येथील वडाच्या झाडाची पूजा करून ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वट पौर्णिमा साजरा करण्यात आली.
यात विशेष म्हणजे ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिला अध्यक्ष शोभाबाई बावणाकर ह्या एक विधवा महिला असून यांनी त्यांनी समाजातील सर्व विधवा महिलांना आव्हान केले की,वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या सोयीनुसार एक सामाजिक बांधीलकी म्हणून व आरोग्यच्या दृष्टीकोनातून एक झाड लावून त्याची जोपासना करावी.असे वट पौर्णिमेच्या दिवशी आव्हान करत वट पौर्णिमा साजरी केली.

सौभाग्यवती वडाच्या झाडाची पूजा करतांनी सौ.किरण मते यांनी वटवृक्ष आणि स्त्री यांच्यातील महत्त्व समजावून सांगितले.स्त्री आणि वटवृक्ष यांचे नाते आरोग्याच्या दृष्टीने लक्षात घेतले पाहिजे वटवृक्ष प्राणी,पक्षी आणि मानवाला आसरा देतो.घनदाट सुदृढ दीर्घायुष्य असतो.
या झाडाची सर्वात दाट सावली असते. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते.त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते.याचत वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे. हे सांगताना सौ.कल्याणी मते म्हणतात की , कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्
| शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्
अर्थात विहिरीचे पाणी,वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते या तीनही युक्त घर होते तोवर कूलर,एसी लागत नव्हता.
वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे असे प्रतिपादन केले.या प्रसंगी शोभाबाई बावनकर,श्वेता मदनकर,कल्याणी मते,माधुरी राऊत,सुनीता मदनकार,माधुरी मते,सपना मदनकर,वनमाला मते,वर्षा दिवटे,विद्या मदनकर,पौर्णिमा राऊत उपस्थित होते.
