Crime 24 Tass
crime24tass news

Bhandara News : सर्पदंशाने २४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू: भंडारा जिल्ह्यातील घटना

भंडारा : घरकाम करताना सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील किन्ही येथे घडली. गायत्री हंसराज तरारे (24) राहणार किन्ही असे मृत विवाहितेचे नाव आहे.
शुक्रवारी गायत्री या आपल्या राहत्या घरी काम करत होत्या. त्यावेळी अचानक विषारी सापाने चावा घेतला.आपल्याला सर्पदंश झाल्याचं लक्षात येताच गायत्री यांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली. गायत्री यांना सर्पदंश झाल्याचे कळताच गावात एकच खळबळ उडाली. गायत्री यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने भंडारा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तेथे गायत्रीवर उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, उपचार सुरू असताना रात्री गायत्रीची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नेहमी हसत-मुखत राहणाऱ्या गायत्रीचा अचानक सर्पदंशाने मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]