Crime 24 Tass

Bhandara crime:नागपूरच्या व्यापाऱ्याचा भंडाऱ्यात खून

भंडारा : मोटर पंप आणि पाईप विक्रेत्याचा भंडारा जिल्ह्यात निर्घृण खून करण्यात आला. ही घटना इटगाव नेरला मार्गावर गुरुवारी दुपारी उघडकीस आली.
अनिकेस क्षीरसागर रा. नागपूर असे मृतकाचे नाव आहे. भंडारा – पवनी मार्गावर एमएच ४९ एई २१३९ क्रमांकाची स्विफ्ट गाडी संशयास्पद स्थितीत उभी करण्यात आली.

तरूणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण हे घटनास्थळी पोहचले. मृतदेहाजवळील कागदपत्रांवरून मृतदेह अनिकेश क्षीरसागर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली याबाबत भंडारा पोलीस तपास करीत आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]