- अवघ्या दहा मिनिटात मिळते मदत
- शंभर टक्के तक्रारींचा निपटारा
- जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी
भंडारा : पोलीस विभागाचे डायल ११२ संकटात सापडलेल्या नागरीकांसाठी मोठा आधारस्तंभ ठरीत आहे.अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळ गाठुन तात्काळ तक्रारींचा निपटारा होत असल्याने नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद दिसुन येत आहे.२८ सप्टेंबर २०२१ ते २७ जून २०२२ दरम्यान डायल ११२ वर एकुण २१३७ नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असुन त्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात पोलीस विभाग यशस्वी झाले आहे.यामध्ये सर्वाधींक मदतीचे कॉल भंडारा पोलीस स्टेशनअंतर्गत आल्या आहेत. मे महिन्यात डायल ११२ प्रणालीमध्ये भंडारा जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.भुषण कोळी हे डायल ११२ चे नोडल अधिकारी म्हणुन कारभार सांभाळत आहेत.
एखाद्या घटनेच्या वेळी विंâवा संकटसमयी पोलीस विभाग नेहमीच उशिरा पोहचत असल्याचा समज नागरीकांमध्ये आजही आहे.मात्र घटनेची माहिती पोलीस विभागाला उशिरा मिळत असल्याने विंâबहुना काही तांत्रीक अडचणींमुळे पोलीसांना घटनास्थळी पोहचण्यास उशिर होत असल्याचे दिसुन आले.मात्र पोलीस विभागाच्या डायल ११२ प्रणालीमुळे नागरीकांचा पोलीस विभागाविषयी असलेला गैरसमज दुर होण्यास थोडाफार हातभार लागल्याचे दिसुन येते.मागील आठ ते नऊ महिन्यांत डायल ११२ प्रणालीच्या माध्यमातुन नोंदविण्यात आलेल्या तक्रारींचा शंभर टक्के निपटारा करण्यात आला आहे.सुरूवातील घटनास्थळी पोहचायला लागणारा १५ मिनिटाचा कालावधी आज ९ ते १० मिनिटावर आला असुन येत्या काही दिवसात हा कालावधी आणखी कमी कसा करता येईल याकरीता पोलीस विभाग प्रयत्न करीत आहे.
डायल ११२ प्रणालीच्या माध्यमातुन संकटात सापडलेल्या नागरीकांना अवघ्या दहा मिनिटात मदत पोहचविण्यात येते.
यामध्ये अपघात,कौटुंबिक हिंसा,महिला अत्याचार,अवैध जुगार, शिवीगाळ, मारहाण इत्यादी तक्रारींचा समावेश आहे.डायल ११२ प्रणालीवर मदत मागणाNयांमध्ये सर्वाधीक तक्रारी या अपघात तसेच कौटुंंबिक हिंसाचाराच्या असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयात डायल ११२ चे स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असुन हे विभाग २४ तास नागरीकांच्या सेवेत कार्यरत आहे. डायल ११२ चे नोडल अधिकारी पोउपनि.भुषण कोळी व पोउपनि. किरण औताडे हे याप्रणालीचे नियंत्रण अधिकारी म्हणुन काम सांभाळतात. या यंत्रणेअंतर्गत जिल्ह्यातील १७ पोलीस स्टेशला जीपीएस व एमडीटी सुविधायुक्त अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेले १७ चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.या प्रणालीमध्ये २४२ अधिकारी-कर्मचाNयांची नेमणुक करण्यात आली असुन त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.येत्या काळात डायल ११२ प्रणालीमध्ये आणखी काही चार चाकी व दुचाकी वाहनांचा समावेश होणार असुन तसा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे डायल ११२ चे नोडल अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी यांनी सांगीतले.
डायल ११२ प्रणालीअंतर्गत नागरीकांना अवघ्या दहा मिनिटात मदत पोहचविण्यात येत असुन नागरीकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.मात्र अनेकदा फेक कॉलसुध्दा करण्यात येततात.माझे नागरीकांना आवाहन आहे की नागरीकांनी चुकीचे (फेक) कॉल करू नये अन्यथा संबंधीतावर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल.
वसंत जाधव
जिल्हा पोलीस अधिक्षक भंडारा
