- इटगाव जंगलातील व्यापाºयाची हत्या प्रकरण
- स्थानिक गुन्हे शाखा व अड्याळ पोलीसांची कामगिरी
- अवघ्या १२ तासात आरोपी जेरबंद
भंडारा : अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत इटगाव जंगल परिसरात नागपूर येथील एका व्यापाºयाचा खुन करण्यात आल्याची घटना दि.३० जुन रोजी उघडकीस आली होती.पोलीसांनी सदर मृतदेहाची ओखळ पटविली असता मृतक हा नागपूर येथील व्यापारी अनिकेश अजाबराव क्षिरसागर असल्याचे निष्पन्न झाले.मात्र त्याचा खुन कुणी व कशासाठी केला याचा शोध घेण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते मात्र स्थागुशा व अड्याळ पोलीसांनी आपल्या कुशाग्र बुध्दीचा वापर करीत अवघ्या बारा तासांमध्ये आरोपीचा शोध घेत त्याला बेडया ठोकल्या.आरोपी हा मृतकाचा चुलत भाऊ असल्याचे उघड झाले असुन संदेश राजेंद्र क्षिरसागर वय २४ वर्ष रा.प्लॉट ९०५ साई कृष्ण रेसीडेंन्सी पिपला हुडकेश्वर नागपूर असे आरोपीचे नाव आहे.
दिनांक ३० जूून रोजी इटगाव जंगल परिसरात मुख्य रस्त्याच्या ५० मिटर अंतरावर एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळुन आल्याची माहिती पोलीस पाटीलद्ध पुरुषोत्तम चौधरी यांनी अड्याळ पोलीसांना दिली.त्या आधारे पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरुन मृतक हा नागपूर येथील व्यापारी अनिकेश अजाबराव क्षिरसागर याचे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठवुन पुढील तपासाला सुरूवात केली.दरम्यान अड्याळ येथील एका सिसिटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजमध्ये अड्याळ येथील गिºहेपुजे यांच्या दुकानात मृतक व्यापारी व त्याचा भाऊ नागपूरहुन कलेक्शनसाठी आले होते व नंतर भंडारा मार्गे नागपूर करीता निघाल्याचे दिसुन आले.पोलीसांनी मृतकाचा चुलत भाऊ आरोपी संदेश क्षिरसागर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता तो एकटाच कलेक्शन करीता ब्रम्हपुरी येथे आल्याचे व मृतक अनिकेश क्षिरसागर हा कार घेवुन भंडाराकडे गेल्याचे सांगीतले.
पोलीसांना संदेश क्षिरसागर यांच्या चौकशीकरीता अड्याळ पोलीस स्टेशन येथे आणले.
सुरवातीला आरोपी संदेशने पोलीसांच्या प्रश्नाचे बचावात्मक उत्तरे दिली मात्र पोलीसांकडील असलेले तांत्रीक पुरावे व संशयीताजवळ आढळुन आलेले साहित्य ज्यावर रक्ताचे डाग होते असे पुरावे याच्यात तफावत असल्याने पोलीसांनी त्याची कसुन चौकशी केली असता आरोपी संदेश याने गुन्हा कबुल करीत त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्याचा चुलत भाऊ अनिकेश क्षिरसागर याची निर्घुन हत्या केल्याचे पोलीसांना सांगीतले. आरोपीने पोलीसांची दिशाभुल करण्याच्या दृष्टीने गाडीतील रोकड ,मृतकाच्या शरीरावरील सोन्याचे आभुषण , शस्त्र,चटई व टिफीन इत्यादी साहित्य आपल्या बॅग मध्ये टाकुन ब्रम्हपुरीच्या दिशेने निघुन गेला सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षकअनिकेत भारती , उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि. जयवंत चव्हाण,सपोनि. सुधीर बोरकुटे, पोउपनि. विवेक राऊत, पोउपनि. हरी इंगोले, पोउपनि., हेमराज सोर्ते,एसआय. केळकर, पोहेकॉं. मोहरकर, मारबते, महाजन, खराब, मस्के, रहांगडाले, जांभुळकर, पोना. पुराम ,पोहवा. वैद्य यांनी केली.
जगी ऐसा बंधु नसावा
आरोपी संदेश राजेंद्र क्षिरसागर हा पुर्वी पासुनच वाईट संगतीत होता. तो सुधारावा व त्याने चांगल्या प्रकारे आयुष्य जगावे याकरीता मृतकाने संदेशला स्वत:च्या व्यवसायात सोबत घेतले. परंतु गुंडप्रवृत्तीच्या संदेशने व्यवसायातही अपहार करुण मृतकाला लाखोचा गंडा घातला,तो येथेच न थांबता त्याने चोºया देखील केल्या होत्या. मात्र तरी सुध्दा वडील बंधु या नात्याने मृतकाने संदेशला वेळोवेळी सुधरण्याची संधी दिली. गुंडप्रवृत्ती संदेशच्या मनात नेहमी मृतकाबाबत वैमनस्य वाढत गेले.आणि त्यातच त्याने अनिकेशचा काटा काढण्याचे ठरविले व कट रचला. त्यानुसार आरोपीने तिन दिवसाअगोदर धारदार शस्त्र खरेदी केला. बुधवारी आरोपी व मृतक हे दोघेहीभाऊ कलेक्शनकरीता नागपूरहुन जेवनाचा डब्बा घेवुन निघाले. मृतक अनिकेशला जंगलात जेवणाचा छंद असल्याने अड्याळ येथील कामकाज आटोपुन इटगावच्या जंगलात रस्त्यालगत गाडी थांबवुन जेवन करण्याकरीता बसले असतांना डब्यावरील तेलाचे डाग पुसण्यासाठी झाडाची पाने आणण्याचे कारण सांगुन आरोपी संदेशने त्याच्या बॅग मधील शस्त्र काढुन पाठमोºया बसलेल्या अनिकेशच्या मानेवर मागेहुन सपासप वार करुन त्यास जिवानीशी ठार केले.
वसंत जाधव
पोलीस अधीक्षक, भंडारा
