अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात
भंडारा : जिल्ह्यात व्यवसायीक घरफोडी करून व्यापाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणाºया अट्टल चोरास भंडारा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने (गुन्हे प्रगटीकरण पथक) अटक केली आहे.त्याच्या ताब्यातुन पोलीसांनी चोरीच्या कामात वापरण्यात येणारे साहित्य व नगदी असा मुद्देमाल जप्त केला.भंडारा पोलीसांच्या या कारवाईमुळे विशेषकरून भंडारा शहरातील व्यापाºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक २९ जून ते १ जूलै २०२२ ला रात्रीच्या दरम्यान भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरातील व्यावसायिक दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. त्याच दरम्यान लागोपाठ दोन दिवस भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरातील व्यवसायिकांच्या दुकानांचे शटर तोडून चोरी झाल्याने व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याची तक्रार भंडारा पोलिसांत करण्यात आली होती.परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने आरोपीचा शोध घेवुन त्याला अटक करण्याचे भंडारा पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले होते.
त्या अनुषंगाने भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पथके तयार करून आरोपीला पकडण्यास रवाना करण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे रात्रीच्या दरम्यान बस स्थानक परिसर भंडारा येथून दुकानाचे शटर तोडतांना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.
संतोष सुरेश राजपूत (३७) रा.प्रतापनगर जि. नागपूर असे आरोपीचे नाव असून याच्या कडून लोखंडी रॉड, आरीब्लेड,पेचकस,बॅग आणि १० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एक ते दीड महिन्या अगोदर तो कारागृहातून बाहेर आला
प्राप्त माहिती नुसार आरोपी संतोष सुरेश राजपूत हा नागपूर येथील रहिवासी असून त्याने नागपूर येथे सुद्धा अनेक ठिकाणी घरफोडी केली आहे. आरोपीवर नागपूर येथील विविध पोलीस स्टेशन मध्ये जवळपास २० गुन्हे दाखल असून हा आरोपी आताच सद्या एक ते दीड महिन्या अगोदर तो कारागृहातून बाहेर आला आहे. मागील काही दिवसापासुन त्याने भंडारा जिल्ह्यात चोरीचा सपाटा लावला होता. मागील १५ ते २० दिवसांपूर्वी साकोली येथे सुद्धा अनेक व्यवसायिक दुकाने फोडल्याची कबुली दिली असून भंडारा जिल्हात दोन ते तीन दिवसात ८ चोºया केल्या आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव , अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदनात भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप.निरीक्षक निखिल रहाटे, सहायक फौजदार पुरुषोत्तम शेंडे , पोलीस हवालदार बालाराम वरखडे , मौजीलाल शहारे, प्रशांत भोंगाडे , साजन वाघमारे , पोलीस शिपाई नरेंद्र झलके , हिरा लांडगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
