भंडारा : दुचाकीत पेट्रोल भरायला गेलेल्या युवकांनी चाकूच्या धाकावर मारहाण आणि दरोडा घातला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. त्यात तीन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी रात्री आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या बालाजी पेट्रोलपंप येथे घडली.
अंकित हडपे, जिवेश सोनटक्के दोघेही रा. कस्तुरबा गांधी वॉर्ड, भंडारा, हिमांशू डोंगरे, सागर डोंगरे दोघेही रा. गायत्री नगर, गणेशपुर, दुर्गेश सोयाम रा. संत शिरोमणी शाळेजवळ भंडारा, सॅम्युएल बडवाई रा. सुभाष वार्ड गणेशपुर यांच्यासह तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक केली आहे. आरोपींनी वापरलेला चाकू आणि चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. एका दुचाकीत ५० रुपयाचा पेट्रोल भरल्यानंतर पैसे देण्यावरून त्यांनी पेट्रोलपंपवरील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. त्यानंतर चाकू काढून त्यांना मारहाण केली. एवढ्यावरच तिने थांबतात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या खिशातील पैसे हिसकावून तिथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष बारसे, डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक निखिल राहाटे, बालाराम वरखेडे, मौजिलाल शहारे, प्रशांत भोंगाडे, साजन वाघमारे, नरेंद्र झलके, हिरा लांडगे, योगिता कौशल, सुनिता शेंडे, अश्विनी तांडेकर हे पेट्रोल पंपवर पोहोचले. त्यांनी तपासाची सूत्रे हलवून त्यांनी तातडीने सर्वांच्या मुस्क्या आवडल्या. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अवघ्या आठ तासात अटक करण्यात आली.
