Crime 24 Tass
crime24tass news

सिंगापूर खुली बॅडिमटन स्पर्धा : सायनाचा जियाओला पराभवाचा धक्का

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सायनाने पाचव्या मानांकित जियाओला २१-१९, ११-२१, २१-१७ असे पराभूत केले.

सिंगापूर : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने सूर गवसल्याची ग्वाही देताना गुरुवारी सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील चीनच्या हे बिंग जियाओला पराभवाचा धक्का दिला. पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय यांनीही उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सायनाने पाचव्या मानांकित जियाओला २१-१९, ११-२१, २१-१७ असे पराभूत केले. जवळपास अडीच वर्षांत प्रथमच तिने स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिचा पुढील सामना जपानच्या अया ओहोरीशी होईल. अश्मिता चलिहानेही चीनच्या हॅन युईकडून ९-२१, १३-२१ असा पराभव पत्करला. तिसऱ्या मानांकित सिंधूने व्हिएतनामच्या थुय लिन्ह गुएनवर १९-२१, २१-१९, २१-१८ असा विजय मिळवला.

पुरुष एकेरीत प्रणॉयने तिसऱ्या मानांकित चायनीज तैपेईच्या चोऊ टिएन चेनचे १४-२१, २२-२०, २१-१८ असे नामोहरम केले. आता प्रणॉयचा सामना जपानच्या कोडाई नाराओकाशी होईल. श्रीकांतला हरवणाऱ्या मिथुन मंजूनाथने आर्यलडच्या नहात एनगुएनकडून १०-२१, २१-१८, १६-२१ अशी हार पत्करली.

पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीने मलेशियाच्या गो झे फेई आणि नूर इझुद्दिन जोडीला १८-२१, २४-२२, २१-१८ हरवले. महिला दुहेरीत डू युई आणि ली वेन मेई जोडीने भारताच्या पूजा दांडू आणि आरती सारा सुनिल जोडीला २१-१२, २१-६ असे नमवले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]