Crime 24 Tass
Crime-24-Tass-news

Bhandara Flood: चौफेर पूर, त्यात प्रकृती खालावली! ऍम्बुलन्स कुठून नेणार? अखेर बोट मदतीला धावली

भंडारा : भंडारा जिल्ह्यात मुसळधार (Bhandara Rain Update) पावसाने झोडपून काढलंय.नद्यांना पूर आला आहे. पुराने जनजीवन विस्कळीत झालंय. अशावेळी रुग्णसेवेची अवस्थाही बिकट झाली आहे. अशात साधी वाहनं जाऊ शकत नाही, तिथं रुग्णवाहिका जाणं दूरच. मग रुग्णांची (Bhandara Flood News) प्रकृती खालावली तर काय करायचं? अशा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाआठी पुराच्या पाण्यातून वाट काढत अखेर बोट धावली आहे. प्रकृती नाजूक झालेल्या दोघा रुग्णांना वाचवण्यासाठी त्यांना बोटीतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. भंडाऱ्यातील (Bhandara News) चूलबंद व वैनगंगेच्या पुराचा वेढा पडलेल्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आवळीबेट येथे दोघा रुग्णांची प्रकृती अचानक खालावली. या दोघांनाही चूलबंद नदीच्या पुरातून बोटीच्या मदतीने प्रशासनाने आणून लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

प्रशासनाची तत्परता
लाखांदूर चे तहसीलदार वैभव पवार यांच्या पुढाकारातून तालुका प्रशासनाने रबरी बोटीने आवळीबेट गाठत दोघांनाही उपचारासाठी आणलं. तालुका प्रशासनाच्या तप्तरतेने दोन्ही रुग्णाचे प्राण वाचले आहे. दिवारू दिघोरे (50) आणि सोनू नितीन वासनिक (35) असे उपचारासाठी दाखल केलेल्या दोघा रुग्णांची नावे आहेत.

4 दिवसांपासून पुराचा वेढा
चार दिवसांपासून चूलबंद व वैनगंगेच्या पुराचा वेढा आवळीबेट गावाला पडला आहे. 500 गावकरी येथे अडकून आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावकऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. अशातच दिघोरे आणि सोनू वासनिक आजारी पडले. गावात डॉक्टर नाही. पुरामुळे रुग्णालयात जाता येत नाही. आता काय करावे? अशा चिंतेत गावकारी पडले.

या प्रकाराची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली. प्रशासनाकडून तत्काळ मदतीची मागणी करण्यात आली. लागलीच लाखांदुर तहसीलदार यांनी वेळीच दखल घेत बोटीच्या सहाय्याने चूलबंद नदीच्या पुरातून आवळी गाठत नाजूक व सोनू या दोन रुग्णांना घेऊन नदी पार करीत पैलतीर गाठले. या दोघांनाही स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे आणि मग डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]