Crime 24 Tass

खासदार,आमदार साहेब तसेच माजी नगरसेवकांनो भंडारा शहराच्या खड्ड्याकडे लक्ष द्या ; संजय मते

भंडारा ;- भंडारा शहरातील सामान्य मतदार आपणास सर्व लक्षात असेल आपला भंडारा जिल्हा व शहर सर्व जातीनिहाय धर्माच्या आदर सन्मान करणारा शांतीमय जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.दरवर्षी जिल्ह्यात व शहरात पावसाळाला सुरवात की शहराच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसतात.भंडारा शहराची व्यथा असे आहे की लोकप्रिय,विश्वासू आमदार,खासदार असतांना शहरातील रस्त्यावर खड्ड्यात खड्डे होतात गेल्या काही वर्षांपूर्वी खड्ड्यामुळे एका होतकरू युवकाचा जीव गेला तसेच शीतला माता मंदिराजवळील खड्ड्यामुळे येत्या पंधरा दिवसाच्या निष्पाप व्यक्तींचा जीव गेला मात्र वर्षा लोटूनही प्रशासनात जाग आली नाही.खासदार,आमदार साहेबांना तसेच नगरसेवकांना जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन हे आणखी किती लोकांच्या जीव घेण्याची वाट पाहत आहेत.सामान्य मतदार नागरिक हे आमदार खासदार नगरसेवक यांना कश्यासाठी निवडून देतात.आपल्या जीवावर उठवण्यासाठी निवडून देतात का.

माझ्या भंडारा शहरातील राजकीय मित्र बंधू भगिनींनो आपला नेता आमदार मंत्री कसा होईल यासाठी अवघ्या पंधरा दिवसा अगोदर नवीन सरकार स्थापन झाली आहे सरकारमध्ये आपला नेता मंत्री व्हावा म्हणून देवाला साकडे घातले. प्रसार माध्यमातून आपणास विनंती आहे की भंडारा शहरातील खड्डे बुजवण्यासाठी रस्ते निर्माण करण्यासाठी आपल्या नेत्याला साखळे घालाल ही मनःपूर्वक अपेक्षा आहे.

नगर प्रशासनाला विचारले असता नगर प्रशासन विनोद जाधव साहेब म्हणतात की,शहरात झालेले अपघात महामार्गावरील आहेत जिल्हा प्रशासनाला याची काहीच कल्पना नाही आम्ही सामान्य नागरिक कोणाकडे दाद मागावी आणि कोणाकडे हात पुढे करावा.मागील पाच वर्षाच्या आधी थेट जनतेतून निवडून आलेले तसेच एहाती पक्षाची सरकार असताना सरकार मधले नगरसेवक नगराध्यक्ष आमची ऐकत नाही अशी आरडाओरड करायचे सार्वजनिक स्थळी चर्चा करायचे कामासाठी धावपळ करायचे मग त्यांचे मधुरमिलन व्हायचा मग नगरसेवकांना काम मिळायचे अशीच धडपड भंडारा शहरातील खड्डे नाली साचलेला सांडपाणी डेंगू मलेरिया होत असलेले त्याच भंडारा शहराच्या आरोग्याच्या विषयाशी तारांबळ उडत आहे.आता माजी नगरसेवक पुन्हा नगर परिषद निवडणुकीची धाकधूकीत आहे.

नेत्याकडे तिकीट कशी मिळेल यासाठी धावपळ करत आहेत

आपल्याला नेत्याकडे तिकीट कशी मिळेल यासाठी धावपळ करत आहेत मोर्चे बांधणी करत आहेत काही अवशे-गौसे नगरसेवक बनण्यासाठी लोकांच्या दारोदारी जाऊन आपल्या जीवाच्या आटापिटा करीत आहेत पण भंडारा शहरातील खड्डे रस्ते कोण करेल यासाठी कोणीही आटापिटा करीत नाही मी भंडारा शहरातील सामान्य नागरिक आमदार खासदार साहेबांच्या तसेच नगरसेवकांना प्रार्थना करतो की त्यांनी भंडारा शहरातील खड्डे सांडपाणी या सर्व बाबीकडे लक्ष द्यावे अशी विनंती करतो.


तसेच पोलीस प्रशासनाला सामान्य नागरिक म्हणून विनवणी आहे की भंडारा नगरपरिषद भंडारा शहराच्या चौरस्त्यावर लावलेल्या ट्राफिक सिग्नल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावे. आमच्या पोलीस शिपाई जीवाशी परवा न करता भर उन्हाळ्यात पावसाळ्यात रस्त्यावर उभा राहतो व ट्राफिक कंट्रोल करीत असतो व सेवा देत असतो. निदान त्यांच्या जीवाची पर्वा करून जिल्हा प्रशासन नगर प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी एकत्र बसून शहरातील ट्राफिक सिग्नलच्या समस्या कशा सोडवाव्यात याकडे लक्ष केंद्रित करावे.


भंडारा शहरातील सर्व पत्रकारबंधू तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे साचलेला पाणी आरोग्य विषयावर आपल्या लेखणी द्वारे प्रशासनाला जागे करत असतात तरीसुद्धा नगर प्रशासन जिल्हा प्रशासन भंडारा शहरातील लोकप्रतिनिधी का बरं या विषयाकडे गांभीर्याने विचार करत लक्ष का देत नाही.मी संजय मते भंडारा शहरातील सामान्य नागरिक आपणास नम्रपणे विनंती करतो की राजकीय हेवेदावे बाजूला सारून शहराच्या विकासाकरिता तसेच सुख शांती करिता समृद्धी करिता विचार करावी ही विनंती…

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]