Crime 24 Tass
Crime-24-tass-news

Bhandara leopard attack: जखमी बिबट्यावर उपचारासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला

Bhandara Leopard Attack : अज्ञात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या मादी बिबट्यावर (Leopard) उपचार करायला गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर (Forest Employee) त्याच बिबट्याने हल्ला केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यात घडली आहे.कृष्णा सानप (वय 34 वर्षे) असे जखमी वनरक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय इथे उपचार सुरु आहेत. भंडारा जिल्ह्याच्या मोहघाटा जंगल शिवारातील महाराष्ट्र वन विकास महामंडळ रोपवाटिकाजवळ ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वन कर्मचारीही धास्तावले आहेत.

नेमकं काय घडलं?


राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वर लाखनीकडून साकोलीकडे जात असलेल्या अज्ञात ट्रकच्या धडकेत मादी बिबट जखमी झाली होती. दरम्यान याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर साकोलीचे सहाय्यक वनरक्षक राठोड आणि लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावर पडलेल्या जखमी मादी बिबट्यावर उपचार करत असताना याच बिबट्याने लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर बिबट्या जंगल शिवारात पळून गेला. या हल्ल्यात कृष्णा सानप जखमी झाले.

वन रक्षकावर उपचारांसाठी भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात हलवल

जखमी वन रक्षक कृष्णा सानप यांना प्राथमिक उपचाराकरता लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान जखमी मादी बिबट्या जंगल शिवारात पळून गेला असल्याने वन कर्मचारी तिचा शोध घेत आहे. मात्र संततधार पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]