भंडारा : बहिणीची हत्या करणाऱ्या जावयाची हत्या करून बदला घेण्याची खूणगाठ मनात बांधली होती. त्यानुसार गुरुवारी बदला घेण्यासाठी गेलेल्या दोघांनी जावई भेटला नाही. मात्र, त्याचा भाऊ मिळाल्याने फावड्याने त्यांच्यावर हल्ला करून मृतक बहिणीच्या दिराची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील मेंढा परिसरात असलेल्या भृशुंड मंदिर परिसराच्या मागील बोडीलगत घडली. यात प्रकाश मेश्राम असे मृतकाचे नाव असून यात भंडारा पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
