दोन पोलिस अधिकारी निलंबित तर एक महिला पोलिस कर्मचाऱ्याची बदली..
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिसाना पीड़ित महिलेवर दुर्लक्ष करने भोवले असून या प्रकरणात भंडारा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यानी 2 पोलिस अधिकाऱ्याना निलंबित केले आहे, तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची बदली केली गेली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे व सहाय्यक पोलिस उप निरीक्षक लखन उईके यांना तड़का फड़की निलंबित करण्यात आले असून एक महिला पोलिस कर्मचारी खोब्रागडे यांची भंडारा मुख्यलयी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे…
